पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या परिसरात विविध विकासाचे प्रकल्प येणार्या काळात सुरू होणार आहेत. त्याद्वारे युवा पिढीला त्यांचे कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण तालुका रहिवासी संघाच्या गुणगौरव सोहळ्यात केले.
पेण तालुका रहिवासी संघाचे सभासद आणि पाल्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर आणि अतुल म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष बी.आर. पाटील, रवींद्रनाथ पाटील, नारायण ठाकूर, मच्छिंद्र नाईक, महेश पाटील, नरेश म्हात्रे, श्री. मोकल, लीलाधर भोईर, नारायण जांभळे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या सोहळ्यात दहावी, बारावी, पदवी, पदवीत्तरांसह विशेष गुणवत्ताधारक सभासद, सेवानिवृत्त सभासद तसेच 70 वर्षांवरील सभासदांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये योगिता पाटील, मोहन म्हात्रे, नारायण ठाकूर, गोपी पाटील, डॉ. दिपाली जांभळे, गौतमी म्हात्रे, किशोर म्हात्रे, नरेश म्हात्रे यांना विशेष गुणवत्ताधारक म्हणून गौरविण्यात आले.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper