Breaking News

अनधिकृत फुलविके्रत्यांवर तातडीने कारवाई करावी

नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी

पनवेल ः वार्ताहर

पनवेल महापालिका हद्दीतील जुने भाजी मार्केट विभागातील कृष्णाळे तलाव व त्यासमोरील गाडी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या फुलविक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे.

अनधिकृतरित्या फुले, गजरे विकणारे हे पनवेलचे स्थानिक रहिवासी नसतानाही ते अनधिकृतरित्या इथे राहून परिसर अस्वच्छ करीत आहेत. सुरुवातीला काही प्रमाणात असणार्‍या या लोकांची लोकसंख्या आता 150च्या घरात गेलेली आहेत. वेळीच जर याला आळा घातला नाही, तर इथली संख्यासुद्धा वाढेल व त्यांना काढून टाकणे अवघड होईल, असे नगरसेविका रूचिता लोंढे यांनी नुकतेच महासभेत सांगितले व यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply