पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठ्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या पाठपुराव्यातून उभारण्यात येणार्या पथदिव्यांच्या कामाचे भूमिपूजन आणि नगरसेवक निधीमधून डस्टबिनचे वाटप सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) करण्यात आले. या वेळी त्यांनी रवी गोवारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नगरसेविका हेमलता गोवारी यांनी कामोठे सेक्टर 12 व 14मध्ये पथदिवे उभारण्यात यावे यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सेक्टर 12मध्ये दोन ठिकाणी, तर सेक्टर 14 येथे एका ठिकाणी पथदिवे उभारण्यात येणार आहेत. या कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच कामोठ्यातील 29 सोसायट्यांना हेमलता गोवारी यांच्या नगरसेवक निधीतून डस्टबिन वाटप कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नगरसेविका कुसुम म्हात्रे, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, रमेश तुपे, सुशील शर्मा, युवा मोर्चा शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, शरद जगताप, प्रवीण कोरडे, नवनाथ भोसले, जय पावणेकर, उत्कल घाडगे, साधना आचार्य, वैशाली जगदाळे, हरपिंदर सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जयदादा युवा मंच व इतर कार्यकत्यांनी केले होते. जयकुमार डिगोळे, गोमेश म्हात्रे, तेजस जाधव, रवी भगत, अनिकेत म्हात्रे, प्रशांत मिश्रा, आशुतोष सोनावणे, संदीप भांगे, तेजस खाडे, गणेश सोलंकी, मनमीत सिंग, सत्यम शर्मा, रॉबीन जैस्वाल यांनी यावेळी विशेष मेहनत घेतली.