पनवेल : वार्ताहर
लोकमान्य टिळक लॉ कॉलेज विद्यार्थ्यांनी पनवेल तहसील कार्यालयाला अभ्यास दौरा अंतर्गत भेट दिली. या वेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जमीन विषयक, कायदे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयात ही पहिलीच भेट होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारले. यावेळी न्यायालयीन अधिकार काय असतात, महसूल संबंधातील नियम काय असतात तसेच सातबारा, आठ अ, फेरफार विषयीची माहिती तहसिलदार विजय तळेकर यांनी लॉच्या विद्यार्थ्यांना दिली. तहसिलदार संजीव मांडे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.