खोपोली : प्रतिनिधी
धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव रविवारी (दि. 1) माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. रविवारी सकाळी मंदिरात श्रींचा दुधाभिषेक, होमहवन आणि सत्यनारायण महापूजा झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जानकर यांच्या नेतृत्वाखाली पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. बोरघाटात हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. दुपारी मान्यवरांचा सत्कार करून महिलांसाठी हळदिकुंकवाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी मंदिरात आरती करण्यात आसली. शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक बबन शेडगे, बबन खरात, बाळासाहेब झोरे, बाळासाहेब आखाडे, नामदेव हिरवे, दीपक ाखाडे, अध्यक्ष भरत कोकरे, उपाध्यक्ष वाघू कोकरे, सचिव लक्ष्मण बावदाने, खजिनदार बबन जानकर, सदस्य नारायण हिरवे, बापू बावदाने, एकनाथ घाटे, भीमा शिंगाडे, बाळू आखाडे, अरविंद गोरे, रामदास जानकर, सतीश गोरे, एकनाथ घाटे, पांडुरंग झोरे, पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य गणेश धानिवले, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, माजी नगरसेवक मणेश यादव, सुनील पाटील, मोहन औसरमल, हरीश काळे, माजी नगरसेविका प्रमिला सुर्वे, लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविनजी काकडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे, धनगर समाज रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे, माजी अध्यक्ष रामचंद्र पुकले, भगवान ढेबे, संतोष ढवळे, अनंता हिरवे, विद्याताई जानकर, योगिता कोकरे, नागेश मरगले, गोविंद कोकरे, संजय कोकरे, धूला कोकरे, संतोष बोडेकर, संतोष शिंगाडे नथु ढेबे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.