

पनवेल ः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती सुकापूर येथील ओमकार सोसायटीमध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी कार्यक्रमाला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी आळूराम केणी, अशोक पाटील, योगेश पाटील, आत्माराम पाटील, संजय पाटील, महेश केणी, राजेश पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.