Breaking News

खारघरमधील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई सुरू

भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश

खारघर : रामप्रहर वृत्त

येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व पनवेल महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर त्यांनी याबाबत पाठुळपरोवा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून खारघर वाहतूक शाखेकडून या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

खारघर सेक्टर 3 बेलपाडा स्कायवॉकलगत काही नागरिक गाड्या पार्किंग करुन कामानिमित्त रेल्वेने प्रवास करतात. दिवसभर गाड्या तेथे बेकायदेशीर पार्किंग असतात. खारघर स्टेशनवर पार्किंगची सोय असूनसुद्धा नागरिक गाडी कुठेही पार्क करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. हे लक्षात घेता, बेलपाडा येथे बेकायदेशीर पार्किंग करणार्‍यांवर आपण लवकरात लवकर कारवाई करावी असे प्रभाकर घरत यांनी निवेदनातून केली होती.

याबाबत खारघर वाहतूक पोलिसांनी दखल घेऊन बेकायदेशीररित्या वाहने पार्क करणार्‍या 449 चालकांविरोधात एप्रिल महिन्यात करण्यात आल्याचे पत्र प्रभाकर घरत यांना खारघर वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवरही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. त्याबद्दल प्रभावकर घरत यांनी खारघर वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply