Breaking News

महावितरणकडून बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा ‘शॉक’; ग्राहकांमध्ये संताप

पेण : प्रतिनिधी

महावितरणने ग्राहकांना भर उन्हाळ्यात अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा शॉक दिला आहे. पेण तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणाकडे जमा करावी लागणार आहे. मार्च महिन्याच्या वीज बीलांसोबत पेण तालुक्यातील महावितरणच्या लाखो ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बीले देण्यात आली आहेत. सुमारे आठ हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जातील, असा अंदाज आहे. सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव हप्त्यात भरायची आहे. कंपनीने पाठवलेल्या बिलांत याचा कसलाच उल्लेख नाही. महावितरणने भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॅाक दिला आहे. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे.  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने वीजपुरवठा सेवेच्या सुधारित तरतुदी राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केल्या होत्या. वीजबिल भरण्यास 21 दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते. यासाठी एका महिन्याहून जास्त कालावधी लागत असल्याने दोन महिन्यांच्या सरासरी बिलाएवढी सुरक्षा रक्कम जमा करण्याचे ठरले होते. बिलांच्या सरासरीचे गणित तयार केले गेले आहे. गेल्या वर्षी त्याच महिन्यातील वीजबिल किंवा गेल्या तीन महिन्यांमधील वीजबिल यापैकी जास्त असलेले बिल सरासरी म्हणून काढली गेली आहे. याच्या दुप्पट रक्कम सुरक्षा ठेव ठेवायची आहे. काही ग्राहकांना दहा हजारांच्या पुढे पैसे जमा करावे लागतील. रीडिंग घेण्यापासून ते देयके येईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी निघून जातो. त्यानंतर अनेक ग्राहकाकडून विलंबाने देयके भरतात. म्हणून एका ऐवजी दोन महिन्याची सुरक्षा ठेव घेण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक घरगुती वीज वापर ग्राहकाला दोन महिन्याची सुरक्षा ठेव या महिन्यात भरावी लागेल. सुरक्षा ठेव रक्कम 17 मे पूर्वी भरायची आहेत. ग्राहकांना बिलांच्या सरासरीवरून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल महावितरणच्या वतीने देण्यात आले असून हे बिल सहा टप्प्यामध्ये भरावायचे आहे. यामुळे एखाद्या महिन्याचे बिल ग्राहकाने न भरल्यास त्याचा मीटर काढल्यानंतर डिपॉजिटमधून थकबाकी वजा करून मीटरजोडणी पूर्ववत करण्यात येऊ शकते. अशी माहिती पेण विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंता उमाकांत सपकाळे यांनी दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply