Breaking News

मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात ; सहा महिन्यांत वाहतूक सुरू होणार, चिनी बनावटीचे डबे दाखल

खारघर ः रामप्रहर वृत्त

 सहा वर्षांपूर्वी बेलापूर ते पेंदार या मेट्रो रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सिडकोने दक्षिण नवी मुंबईत पाच मेट्रो मार्गांचा आराखडा तयार केला आहे. यात बेलापूर ते पेंदार या मार्गाचा पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 26 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 8 हजार 887 कोटी रुपये खर्च करणार असून हा मार्गे खांदेश्वरमार्गे नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणार आहे. मेट्रोच्या या सर्व कामांवर दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन देखरेख ठेवत असून सध्या व्हायडक्ट व स्टेशन ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

 तळोजा रेल्वेमार्गावर उभारण्यात येणारे उड्डाणपुलाचे काम व शीव-पनवेल मार्गावरील उड्डाणपूल जोडले गेले आहेत. आता केवळ विद्युत तांत्रिक कामे बाकी असून ती प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पाच्या मेट्रो चाचणीसाठी लागणारे रॅक्स चीनवरून आयात करण्यात आले असून त्यांची चाचणी लवकरच घेण्यात येईल. विधानसभा निवडणुकीआधी मेट्रो मार्गाचा शुभारंभ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या कामाला आता गती आली आहे. यासंदर्भात सिडको मुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, मात्र सिडकोने या मेट्रोच्या पूर्ततेसाठी योग्य ती तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

-कामगार व उद्योजकांना फायदा

 हा मार्ग पेंदार या सिडको क्षेत्राच्या पुढे तळोजा एमआयडीसीत नेण्याचा निर्णय एक वर्षापूर्वी सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. तळोजा एमआयडीसीतील कामगार व उद्योजक यांना या मेट्रो वाहतुकीचा फार मोठा फायदा होणार आहे.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply