Breaking News

आरसीएच कार्यक्रमात पनवेल महापालिका राज्यात दुसरी

पनवेल ः प्रतिनिधी

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात (आरसीएच) पनवेल महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे यशदा येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत याबाबतची घोषणा करण्यात आली.

आरोग्य विभाग संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या वतीने 12 व 13 मे रोजी पल्स पोलिओ, लहान मुलांचे लसीकरण, टीबी, क्षयरोग निर्मुलन, कुष्ठरोग मोहीम, निमियामुक्त भारत, आरोग्य शिबिर, जंतनाशक कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, भरारी पथके, प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजना, राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम असे अनेक आरसीएच कार्यक्रम उत्तमरित्या राबविले जातात. या सर्व कार्यक्रमांचे मूल्यांकन निती आयोग इंडिकेटर परफॉमन्सद्वारे केले जाते. या मूल्यांकनामध्ये पनवेल महापालिकेने राज्यातील सर्व महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे.

वैद्यकीय आरोग्य विभागाच्या या कामगिरीबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनीही मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्याबरोबर सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply