Breaking News

पांड्या रिटर्न! अवघ्या 37 चेंडूंत ठोकले शतक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला भारतीय संघाचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने दमदार पुनरागमन केले आहे. पांड्याने डॉ. डी वाय पाटील टी-20 स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळताना अवघ्या 37 चेंडूंत दमदार शतक झळकावले. या खेळीत त्याने तब्बल 10 षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली.

नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत कॅग संघाविरुद्ध रिलायन्स वन संघाचा सामना मंगळवारी

(दि. 3) रंगला. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत पांड्याने तुफानी फटकेबाजी केली. त्याने केवळ 25 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील 50 धावा केवळ 12 चेंडूंत ठोकल्या. आता पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्यामुळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन करताना दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएलच्या तोंडावर पांड्याची दमदार पुनरागमन जमेची बाजू मानली जात आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply