खारघर ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या वतीने खुटुकबंधन येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 18) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, खारघर अध्यक्ष विनोद घरत, भाजप मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष निशा सिंग, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, चिटणीस फुलाजी ठाकूर, कोषाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिन वासकर, रितेश रघुराजनईम शेख, अमोल सुतार, सारिका जाधव, प्रीती दिघे, नूतन डांगळे, अंगणवाडी शिक्षिका संजना म्हात्रे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.