उरण ः रामप्रहर वृत्त
उरणमध्ये नव्याने निर्माण झालेल्या द्रोणगिरी नोडमध्ये अनेक उणिवा असल्याने येतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असला, तरी येथील नागरिकांच्या समस्या न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याने त्या नक्कीच सोडविल्या जातील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 3) द्रोणगिरी नोडवासीयांना दिला.
द्रोणगिरी नोडमधील समस्यांबाबत भाजप उरण तालुक्याच्या माध्यमातून आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन सेक्टर 50मध्ये करण्यात आले होते. त्या वेळी आमदार महेश बालदी यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित नागरिकांना आश्वासित केले. या जनता दरबारसाठी द्रोणगिरीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
उरण मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची समस्या ही माझी आहे असे समजून मी काम करीत असून प्रत्येक वाद्य वस्तीवरील नागरिकाला नक्कीच न्याय मिळेल. त्यासाठी अनेक योजनांचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी मार्गदर्शनात सूचित केले. जे सध्या जनतेबद्दल कोरडे प्रेम व्यक्त करीत आहेत त्यांना जनतेशी काही देणे घेणे नसून ते फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आमदार बालदी यांनी स्पष्ट करून जनता भाजपच्या कामावर खुश असल्याने विरोधी आघाड्या बेचिराख होतील, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, जि. प. सदस्य विजय भोईर, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, धुतुमचे माजी सरपंच धनाजी ठाकूर, चंद्रकांत घरत, नीलकंठ घरत, पंडित घरत, जितेंद्र घरत, गोपीनाथ म्हात्रे, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …