Breaking News

बेलीचा विनय नेवारेकर ठरला व्हॉइस ऑफ अलिबाग

अलिबाग : प्रतिनिधी

गेले काही दिवस अलिबागमध्ये सिंगिंग स्टार्स करा ओके स्टुडिओत भरणारी मैफिल चांगलीच चर्चेत होती. या स्टुडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गाण्याच्या स्पर्धेत कोण होणार व्हॉइस ऑफ अलिबाग याची सर्वांना उत्सुकता होती. नुकत्याच झालेल्या अंतिम फेरीत अलिबागनजीक बेली गावचा तरुण गायक विनय नरेश नेवारेकर याने ‘व्हॉइस ऑफ अलिबाग’ होण्याचा मान मिळविला. त्याचा 10 हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, आणि चषक देऊन सन्मान करण्यात आला. सिंगिंग स्टार्स करा ओके स्टुडिओचे सर्वेसर्वा राजेंद्र बोराडे आणि आशा बोराडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांचा मुलगा अभिजित याने पडद्यामागची भूमिका भक्कमपणे पार पाडली.  बोराडे  यांचा मित्र परिवार, हितचिंतक, आणि स्टुडिओ मेंबर यांनी मोलाची साथ देऊन ही गायन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेची पहिली फेरी 22मे रोजी तर दुसरी फेरी 28 मे रोजी स्टुडिओमध्ये पार पडली. अंतिम फेरीसाठी तीन गटातील 29 स्पर्धक निवडण्यात आले होते. सोमवारी (दि. 30) संध्याकाळी पीएनपी नाट्यगृहात  अंतिम फेरीला सुरुवात झाली. नाट्यगृहात रसिकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायक संदीप शहा, ज्येष्ठ गायिका कला पाटील आणि संगीतकार तथा गायक विक्रांत वार्डे यांनी काम पाहिले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply