Breaking News

महाड तालुक्यात शेतकरी सभांना प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी महाड यांचे अधिनस्त संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी खरीप हंगाम पूर्व शेतकरी सभांचे आयोजन केले जात आहे. याला शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यामध्ये गावोगावी खरीप हंगामपूर्व शेतकरी सभांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार मौजे राजिवली येथे शेतकरी सभेचे व भातपीक शेती शाळेच्या पहिल्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये भात पिकांमध्ये शेतकर्‍यांना येणार्‍या समस्या, बियाणे बदल व त्याचे फायदे, खत व्यवस्थापन, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, भात लागवडीच्या विविध पद्धती, कृषी यांत्रिकीकरण, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, 10 टक्के खत बचत मोहीम, शेतकर्‍यांचा पिक उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध तंत्राचा अवलंब करणे या विषयी शेतकर्‍यांना कृषी पर्यवेक्षक टी.पी. जगदाळे व कृषी सहायक यु.एस.लेंगरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन केले. तसेच बीज प्रक्रिया मोहिमेंतर्गत शेतकर्‍यांना स्वतःकडील निरोगी व उगवणक्षम बियाणे वापरता यावे याकरिता तीन टक्के मिठाच्या पाण्याची बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. तसेच बियाण्याची उगवण क्षमता चाचणी कशी घ्यावी याचे सुद्धा प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या सभेस ग्रामपंचायत राजिवलीचे सरपंच विकास जगदाळे, उपसरपंच श्रीधर शिंदे व राजिवली येथील शेतकरी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply