Breaking News

स्पर्धांमध्ये ‘सीकेटी’चे विद्यार्थी चमकले

पनवेल : रामप्रहर वृत्त

अखिल भारतीय छावा संघटना व प्रबोधन सामाजिक संस्था खांदा कॉलनी अंतर्गत 24 व 25 नोव्हेंबरला आयोजित विविध स्पर्धांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्पिता ब्रिजकिशोर सिंग (बारावी सायन्स), प्रथम क्रमांक श्रवण कदम (बारावी आर्ट्स); गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मोनालिसा जयदेव समंता (बारावी सायन्स); निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहल पाटील (बारावी आर्ट्स), तृतीय क्रमांक ध्वनी कदम (बारावी आर्ट्स) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, स्वाती पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदाने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply