पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच, आजी-माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी (दि. 1) जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.
नांदगाव येथील विठ्ठल रखुमाई मंदिर गार्डन येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, काशिनाथ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संदिप पाटील, शिवराम पाटील, बाबुराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश पाटील, कुंदा पाटील, साधना गायकर, रामदास कातकरी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, काँग्रेसचे इंटक पनवेल तालुका अध्यक्ष रोहिदास गायकर, माजी सदस्या चंद्रा पाटील, जाना पाटील, माजी सरपंच रेखा कतकरी, जविंद्र गायकर, विनायक गायकर, संतोष गायकर, नवनाथ ढवळे, अभिजीत फडके, देविदास शेळके, पांडूरंग पाटील, नवनाथ खुटले, रत्नाकर पाटील, निखिल खुटले, बाळाराम खुटले, अनिल मालदे, प्रवीण पाटील, गणेश पाटील, संतोष खुटले, अमोल खुटले, अश्विन पाटील, कमला कातकरी, गजानन पाटील, गणेश खुटले, किशोर पाटील, कल्पेश पाटील, समाधान मुंडे, अश्विन पाटील, गणेश पाटील, अमोल खुटले, ऋतिक गायकर, बाळाराम खुटले, अजिंक्य पाटील, मच्छिंद्र मायदे, संजय फडके, विलास खुटले, चंद्रकांत खुटले, धनराज खुटले, गजानन पाटील, दिनेश भगत, लक्ष्मण कातकरी, राकेश खुटले, संतोष भगत, केतन खुटले, साजन खुटले, राहूल भगत, दत्ता भोईर, नरेश खुटले, विक्रम खुटले, विष्णु कातकरी, किरण कातकरी, अर्जुन कातकरी, अमित कटेकर रंजित खुटले, सुरेश कातकरी, प्रकाश कातकरी, निखील भोईर, वैभव खुटले, भावेश फडके, अनिश भोईर, मंगली कातकरी, काळ्या कातकरी, चंद्रकांत कातकरी, अमित कातकरी यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह पदाधिकार्यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केेले. या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, विनोद साबळे, मंगेश वाकडीकर, कर्णा शेलार, राकेश गायकवाड, माजी सरपंच गजाजन पाटील, दत्तात्रेय हातमोडे, रघुनाथ गवंडी, सदस्य विजय गवंडी, अजय तेजे, शरद वांगिलकर, अविनाश गाताडे, राजु पाटील, विद्याधर जोशी, जीवन टाकले, संतोष पारधी, जगदिश पाटील, निलेश वांगीलकर, विनायक पाटील, अॅड. निलेश हातमोडे, विशाल गायकर, मिथून पाटील, निखील भोईर, धनाजी र्पाधी, उपसरपंच अर्चना मिथुन पाटीक, प्रवीण ठाकूर, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.
‘दिबां’च्या नावासंदर्भात शेकापची मागणी लाजीरवाणी -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, शेकापच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध भाजप लढा देत आहे. एक काळ असा होता की शेकापचे नाव लोक आदराने घेत होते. शेकापच्या आंदोलनामध्ये आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी व्हायचे, मात्र आजची स्थिती अशी आहे या तालुक्यासाठी आणि या परिसरासाठी ज्यांनी जन्म घेतला त्यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे ते दि. बा. पाटीलसाहेब ज्यांनी खर्या अर्थाने पनवेल तालुक्यातील गावागावामध्ये प्रकल्पग्रस्तांना अभिमानाने जगायला आणि अन्यायाविरोधात संघर्ष करायला शिकवला, त्या दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले पाहिजे ही मागणी भाजपने केली आहे. मात्र ज्यांनी ही मागणी करायला पाहिजे ते शेकापचे नेते विमानतळाच्या टर्मिनल्सला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी करतात ही लाजीरवाणी गोष्ट आहे असे मत व्यक्त केले.
जे स्वप्नात पाहिले नव्हते ते देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे आणि ज्या पक्षाचे ते नेतृत्व करतात त्या पक्षात तुम्ही प्रवेश केला आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचा पक्ष तुम्ही सोडला आहे. त्यांनी फक्त तुमची गावे वंचित ठेवली. तुमच्यात भांडणे लावली फक्त वापर करून घेतला, ते सगळे आता सोडा. आपल्याला येणार्या काळात विकासाचे राजकारण करायचे आहे. -आमदार महेश बालदी