Breaking News

ग्रोथ आणि व्हॅल्यू गुंतवणूक म्हणजे काय?

ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो.

अनेक वेळा भारतीय माध्यमे गुंतवणुकीविषयी चर्चा करत असताना आपली गुंतवणूक ही ग्रोथ पद्धतीची आहे का व्हॅल्यू पद्धतीची आहे या विषयावर बोलताना दिसतात. यामुळे गुंतवणूकदारांनाही हा प्रश्न पडतो की, ग्रोथ गुंतवणूक किंवा व्हॅल्यू गुंतवणूक यापैकी नेमकी कोणती पद्धत फायदेशीर ठरेल? प्रत्यक्षात इक्विटी अथवा इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करताना विचार केला जाणारा हा दृष्टीकोन आहे. ग्रोथ म्हणजे वृद्धी यासाठी निवडल्या गेलेल्या गुंतवणूक पर्यायामध्ये केलेली गुंतवणूक आणि व्हॅल्यू या पद्धतीत ज्याठिकाणी भविष्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे परंतु सध्या या गुंतवणुकीत पर्यायात मोठी संधी आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे त्याला व्हॅल्यू म्हटले जाते. या पद्धतीचा फायदा गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारास भविष्यात होत असतो.

ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो.

प्रत्येक गुंतवणूकदाराने कोणत्याही गोंधळाची मनस्थिती निर्माण न करता दोन्हीही प्रकारात गुंतवणूक करणे भविष्यासाठी फायद्याचे ठरते. ग्रोथ कंपन्या गेल्या काही काळात इतर कंपन्यांच्यापेक्षा वेगाने व जास्त परतावा देत आहेत म्हणूनच त्यांना ग्रोथ कंपन्या म्हटले जाते. हा वाढीव परतावा असाच पुढील काळातही देण्यास या कंपन्या सज्ज झालेल्या असतात.

ग्रोथ कंपन्यांचीलक्षणे

  1. ग्रोथ कंपन्या इतर कंपन्यांपेक्षा थोड्या महाग दरात बाजारात उपलब्ध असतात. कारण या कंपन्यांनी मागील काळात सातत्याने स्पर्धक कंपन्यांपेक्षा जादाचा वार्षिक परतावा दिलेला असतो. त्यामुळेच या ग्रोथ कंपन्या बाजारपेठेमध्ये जास्त दरात (प्रीमियम) उपलब्ध असतात. या प्रकारात येणार्‍या कंपन्यांची भविष्यातही ग्रोथ दिसत असल्याने गुंतवणूकदारही जादाची रक्कम देऊन अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.
  2. सातत्याने चांगला परतावा देण्याचा इतिहास असतो. ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा काळ असतो, त्यावेळीदेखील या ग्रोथ कंपन्या सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसतात.
  3. अशा कंपन्या वेळोवेळी चढ-उतारात पुढे असतात. ग्रोथ कंपन्या चढ्या किंमतीत उपलब्ध असल्याने गुंतवणूकदार त्यासाठी जादाची किंमत मोजत असतो. परंतु एखाद्या तिमाहीत परतावा कमी आला  तर त्याचा बाजारभावावर मोठा परिणाम होताना दिसतो. बाजारातील या कंपन्यांचे मूल्य वेगाने खाली किंवा वेगाने वर जाताना दिसते.

व्हॅल्यू प्रकाराच्या कंपन्यांची लक्षणे

1) या प्रकारात कंपन्या प्रामुख्याने सवलतीच्या (डिस्काऊंट) दरात उपलब्ध असतात. अशा व्हॅल्यू कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची कल्पना म्हणजे स्वस्तात व सवलतीच्या दरात उपलब्ध असणार्‍या कंपन्या ज्या भविष्य काळात आपल्या मूलभूत किंमतीला पोचतील व गुंतवणूकदारास मोठा परतावा मिळेल.

2) या कंपन्यांचे मूल्य बाजारातील इतर कंपन्यांपेक्षा सवलतीच्या दरात उपलब्ध असतात. अनेकवेळी व्हॅल्यू  कंपन्यांच्या भविष्यातील  मूल्याचा अंदाज आज घेणे शक्य न झाल्याने गुंतवणूकदार अशा कंपन्यांना ओळखू शकत नाही. म्हणूनच अशा व्हॅल्यू कंपन्याना जादाचा दर (प्रीमियम) गुंतवणूकदार देत नाही. परंतु कालांतराने अशा व्हॅल्यू कंपन्या आपल्या मूळ किंमतीपर्यंतच पोचतात व नंतरच बाजारातील इतर गुंतवणूकदार अशा कंपन्यांकडे आकर्षिक होतात.

3) व्हॅल्यू कंपन्यांचे मूल्य इतर कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असते. अनेक वेळा बाजारात निर्माण झालेली परिस्थिती, विशिष्ट क्षेत्रात निर्माण झालेली समस्या, अर्थव्यवस्थेत असणारी मंदी, जागतिक घडामोडी इत्यादी अनेक कारणांमुळे व्हॅल्यू कंपन्या सवलतीच्या दरात (डिस्काऊंट प्राईस) उपलब्ध असतात. अनेक गुंतवणूकदार अशा कंपन्यांमधून बाजारातील घडामोडींमुळे दूर जातात. त्यामुळे अशा कंपन्या अत्यंत आकर्षक मूल्याला उपलब्ध असतात.

4) व्हॅल्यू कंपन्यांमध्ये काही प्रमाणात इतर कंपन्यांच्या तुलनेत जोखिम जास्त असते. त्यामुळेच या कंपन्या आपल्या मूलभूत मूल्यापेक्षा स्वस्तात बाजारात उपलब्ध असतात. परंतु या कंपन्यांच्या मूल्यांमध्ये मोठा चढउतार होताना दिसत असते.

-संदीप भूशेट्टी, अर्थप्रहर

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply