Breaking News

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा; जिल्हा परिषद येथे भगव्या ध्वजाची गुढी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. ग्रामपंचायत विभाग कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. या वेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीतगायन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक सुनिता पालकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुदीप बुधले, अशोक कुकलारे, पराग खोत, निलेश वाबळे, सुरेश पाटील व विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नेरळमध्ये शिवपुतळ्यावर दुग्धाभिषेक; परिसरात रांगोळी सजावट

कर्जत : बातमीदार

नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी सहा वाजता पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रांच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवपुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल भाटकर यांच्यासह समितीचे सदस्य देवेंद्र दाभणे, हरेश पवार, प्रमोद कराळे, विशाल साळुंखे, सूरज साळुंखे, प्रतीक भिसे, शाम कडव, हरेश भाटकर, अल्पेश मनवे, दुर्वांकुर पवार, हर्षद भागवत यांच्यासह शिवप्रेमी नागरिक  उपस्थित होते.

चौल येथे ग्रामपंचायतीचे वतीने उभारली स्वराज्यगुढी

रेवदंडा : प्रतिनिधी

शिवस्वराज्य दिनाच्या औचित्याने सोमवारी (दि. 6) चौल ग्रामपंचायतीचे वतीने कार्यालयाच्या प्रांगणात भगव्या स्वराज्यध्वजासह स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. चौल ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी सकाळी आठ वाजता स्वराज्यगुढी उभारण्यात आली.  या वेळी चौल ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजीत गुरव, ग्रामपंचायत सदस्या रूपाली म्हात्रे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी सरपंच प्रतिभा पवार यांनी स्वराज्यगुढीला अभिवादन केले, त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गिताचे गायन करण्यात आले.

माणगावमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीच्या माणगाव येथील टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये सोमवारी (दि. 6) शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांची आपण सर्वांनी रोज पुजा केली पाहिजे. प्रत्येक घरात व प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य जोशी यांनी या वेळी केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महाराजांच्या आठवणी म्हणून वेगवेगळ्या दोन चित्रफिती दाखवण्यात आल्या. त्यानंतर शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, छत्रपती शिवाजी महाराज राजांचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. जोशी, अमित बाकाडे, दिलीप ढेपे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी पहल या संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply