Breaking News

राज्यस्तरीय पिंच्याक सिलेट स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलेट असोसिएशन चषक स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पिंच्याक सिलेट असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ रौप्यपदके जिंकली. यामध्ये सोहम सावंतने सुवर्ण, वरद केणी, राजेंद्र कन्हेरे, संजना चव्हाण यांनी रौप्य, तर पूजा जगताप, सुयश पवार, रोहित थळी, चिराग शिवगण, सुरेश राठोड, योगेश बैकर, आयुष पाचर्णे, सुजय वेंगुर्लेकर व हर्षदा कारंडे यांनी कांस्यपदक पटकाविले. सर्व विजेत्या खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि पिंच्याक सिलेट असोसिएशन ऑफ पनवेलचे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर, पिंच्याक सिलेट असोसिएशन पनवेलचे उपाध्यक्ष प्रतिक कारंडे, सचिव स्वप्नाली सणस यांनी कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply