‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा
उरण : प्रतिनिधी : मुलगी शिकली पाहिजे. मुलगी ही घराचं मांगल्य असते. मुलगी हे घरचं नंदनवन असते. आपल्याला जिने जन्म दिला तीसुद्धा मुलगी होती. जर ती नसती, तर आपण या जगात नसतो. अगदी पुरातन काळात या स्त्रीचा महिमा वर्णिला आहे. कौसल्या, देवकी, यशोदा, जिजाबाई यांनी या भारतमातेच्या रक्षणासाठी थोर सुपुत्र म्हणजे प्रभू श्री राम, श्रीकृष्ण आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या सुपुत्रांना जन्म दिला. आज त्याच स्त्रीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक स्त्रीला दिली जाते. स्त्री ची गर्भातच हत्या केली जाते. हे निंदात्मक प्रकार आपल्या समाजात केले जात आहते. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी, बदल होण्यासाठी यांच्यात कुठे तरी समाज प्रबोधन व्हावे, तसेच स्त्री शिक्षण हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे.
यासाठी आवरे अंगणवाडी सेविकांतर्फे आवरे गावात नाट्य किंवा एकांकिका स्पर्धा घेऊन लोकांचे प्रबोधन केले व प्रभात फेरी व सायकल रॅली, पोषण मेळावा अंतर्गत लोकांचे प्रबोधन केले. असे करून बेटी बचाव बेटी पाढाव हा एकच नारा दिला. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला. सदर उपक्रम राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका वंदना रघुनाथ गावंड व वृषाली महेंद्र गावंड यांनी विशेष मेहनत घेतली.