मुरूड : प्रतिनिधी
येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या विज्ञान शाखेचा निकाल 90.67 टक्के तर कला शाखेचा निकाल 73.68टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचे 117 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 106 विद्यार्थी पास झाले. त्यात मनाल हिफाजान उलडे (77.83 टक्के) हिने प्रथम, सहिमा ए. सलाम मुकादम (77.67टक्के) हिने व्दितीय आणि महेक सुहेल गोलंदाज (72.67टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या कला शाखेचे 57 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुबिया शाहिद कलाब (67.50 टक्के) हिने प्रथम, झाहिरा इब्राहिम खान (65.17 टक्के) हिने व्दितीय तर उजमा रईस बागवान (60.83 टक्के) हिने कला शाखेत तृतीय क्रमांक पटकाविला आहे.विज्ञान शाखेत पहिला नंबर मिळविणार्या मनाल हिफाजान उलडे हिचा मुख्याध्यापक जाहिद हुसेन इस्लाईल गोटेकर यांनी अभिनंदन केले. या वेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम कबले, हिफाजान उलडे उपस्थित होते.