नवी मुंबई : बातमीदार
पर्यावरण सप्ताहनिमित्त विवेकानंद संकुल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी प्रदीप मेहता प्रमोद जोशी व आबा रणवरे त्याचप्रमाणे शाळेच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका तसेच शालेय समिती सदस्य मोहन ढवळीकर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये चिंच कडुलिंब बेल जांभूळ चंदन अशा प्रकारच्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमातील वृक्षांची व्यवस्था अध्यापक संतोष मिसाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केली होती. सर्व व्यक्तींनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करावे व त्याचे फोटो समाज माध्यमांमध्ये प्रसारित करावे जेणेकरून वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याची एक चळवळ उभी राहिली अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त केली.
या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या वृक्षांची जोपासना करण्यासाठी विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली.
विद्यार्थ्यांवर वृक्ष संस्कार होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला. छत्रपती शिक्षण मंडळ अनेक सामाजिक उपक्रम करत असते ग्रामीण भागात वनराई बंधारे बांधणे शहरी भागात वृक्षारोपण वृक्ष संवर्धन कंपोस्ट खत अशा प्रकारचे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम शाळेत राबवले जातात.