Breaking News

जासईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील जासई गावातील डुंबा व कातकरीवाडीतील इतर पक्षातील सुमारे 100 ते 125 कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 3) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक बळीशेठ, विशाल म्हात्रे, भाजप जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष भूषण म्हात्रे यांच्या उपस्थितीत आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

या वेळी दहागाव अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, जासई अध्यक्ष सुनील घरत, उद्योजक शिरीष म्हात्रे, अमृत ठाकूर, जयवंत म्हात्रे, न्यू यंग स्टार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ जासई अध्यक्ष रमेश म्हात्रे, बळवंत पाटील आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय भिडे, गुरु भालेकर, राहुल भिडे, अविनाश जाधव, लाखान भिडे, दिनेश येरकर, प्रशांत भालेकर, संतोष मस्के, विकी भिडे, विनोद येरकर, प्रल्हाद मस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply