Breaking News

संजय बियाणी यांच्या हत्येचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : बातमीदार

नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी यांच्या हत्येचा कर्जत माहेश्वरी युवा मंडळाने निषेध केला असून, पोलीस प्रशासनास निवेदन देऊन या प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी केली.

माहेश्वरी समाजातील नांदेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची  दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  बियाणी यांची हत्या करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करुन जलदगती न्यायालयाद्वारे खटला चालवण्यात यावा, या मागणीसाठी कर्जत माहेश्वरी युवा मंडळातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे आणि कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना निवेदन देण्यात आले. कर्जत माहेश्वरी युवा मंडळाच्या मंगला राठी, योगिता चांडक, अश्लेशा भुतडा, वनिता सोनी, योगेश राठी, गणेश डागा, रामेश्वर राठी, अमित चांडक, संदेश भुतडा, लक्ष्मीकांत सोनी, महेश सारडा, मयुर डागा, निलेश डागा, संदिप चांडक आदि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply