Breaking News

भंगार गोदामाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान

पनवेल ः वार्ताहर

पनवेल तालुक्यातील तळोजा येथील भंगार गोदामाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

तळोजात असलेल्या भंगार गोदामात प्लास्टिकसह लाकडी आणि इतर सामान मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. तेथे मध्यरात्री 2च्या सुमारास अचानकपणे आग लागून मोठ्या प्रमाणात असलेले भंगार साहित्य भस्मसात झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तळोजा, नवी मुंबई, कळंबोली, पनवेल बंब घटनास्थळी जाऊन पोहचले व त्यांनी पाच तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply