Breaking News

पनवेलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; प्रजापती विकास मंडळाचा उपक्रम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

प्रजापती विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 26) पनवेलमधील मिरची गल्ली येथील संत गोरा कुंभार मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. पनवेलमधील गरीब व गरजू अशा बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये वॉटर बॉटल, नोटबुक, पेन, पेन्सिल, पाऊच आदी वस्तूंचा समावेश आहे. जवळपास 125 विद्यार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात आले. यासोबत दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगले गुणप्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कुंभारी कलाकारीसाठी यशोदाबाई रघुनाथ कलवेकर आणि मुतीकार कलेसाठी दैवत पनवेलकर, नरेंद्र पनवेलकर व नरेश कुंभार यांनाही सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी सी. पी. प्रजापती, विनोद प्रजापती, इंद्रजीत प्रजापती, अविनाश प्रजापती, राजेंद्र प्रजापती, बंधु प्रजापती आदी संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह कुंभारवाडाचे अमित पांडुरुंग वाजेकर, नरेंद्र गोपीनाथ पनवेलकर, आशिष विजय पनवेलकर, दैवत रामचंद्र पनवेलकर, दत्तात्रेय गोविंद पनवेलकर, सुरेश रामचंद्र कल्याणकर, दिलीप पांडुरंग पनवेलकर आदी उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply