Breaking News

पनवेलमध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रील

पनवेल : वार्ताहर

पावसाळा तोंडावर आल्याने अशा वेळी कुठल्याही प्रकारची घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी पनवेल शहर पोलिसांचे पथक सज्ज असल्याचे पनवेलकरांना दाखवायच्या उद्देशाने आज शहरातील कोळीवाडा गणपती विसर्जन घाट येथे मॉकड्रील करण्यात आले.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे व पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे पथक आणि कोळी बांधव याच्या साथीने मॉकड्रील करून विविध प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply