Breaking News

सोनसाखळी चोरापासून सर्तकता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली, पनवेल परिसरात सोनसाखळी चोरीच्या प्रकारांत वाढ झाली असून महिला वर्गाने प्रतिबंध, सतर्क राहावे, असे मार्गदर्शनपर परिपत्रक कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी मंगळवारी (दि. 14) वटपौर्णिमेनिमित्त पूजेकरिता आलेल्या महिलांना देण्यात आले. त्यांना जागृत राहण्याचे आवाहनही या वेळी पोलिसांनी केले.

सोनसाखळी चोरांबाबत माहिती देऊन प्रतिबंध होण्यासाठी सूचना दिल्या, तसेच परिपत्रक वाटप करून आजूबाजूचे महिलांना सांगण्याबाबत मार्गदर्शन केले. हद्दीतील सर्व पूजेचे ठिकाणी महिलांना परिपत्रक वाटप केले. आता मॉर्निंग वॉकला जाणार्‍या नागरिकांकडून चोरट्यांनी लक्ष वळविले असून अशा नागरिकांनाही परिपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply