Breaking News

“अनंत गीतेंना निवडून आणणारच”

अलिबाग : प्रतिनिधी

नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असून, रायगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनाही निवडून आणाणारच, असा निर्धार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त सभा सोमवारी अलिबागेतील बिगफ्लॅश हॉटेलमध्ये झाली. या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या सभेस भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र  म्हात्रे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, दीपक रानवडे आदी उपस्थित होते.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना 21 हजारांची आघाडी मिळाली होती. ती आघाडी या वेळी तटकरेंना मिळणार नाही. या विधानसभा मतदारसंघात अनंत गीते आघाडी घेतील, असा विश्वास अ‍ॅड. महेश मोहिते व महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यात पेयजल योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. अलिबाग-वडखळ रस्त्याच्या कामाला मंजुरी

मिळाली आहे. मांडवा येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्यात आली आहे. ही कामे मागील पाच वर्षांत झाली असून, ती विरोधकांना दिसत नसतील, तर तो त्यांचा दोष आहे, अशी टीका अ‍ॅड. मोहिते यांनी केली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply