Breaking News

गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार

ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने कर्जत तालुक्यातील गौरकामत येथील शाळेसाठी पाणीपुरवठा योजना राबविली असून, या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी या भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना संस्थे तर्फे संगणक वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण रोटरी क्लब चालविला जातो. या संस्थेकडून कर्जत तालुक्यात शाळांना संगणक, जलशुद्धीकरण संच, तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेे जाते. कर्जत ग्रामीण रोटरी क्लबने तालुक्यातील जांभिवली गौरकामत येथील स्वामी विवेकानंद हायस्कुलच्या आवारात  बोअरवेल, इलेक्ट्रिक पंप आणि जलशुद्धीकरण संच कार्यान्वीत केला आहे. त्याचे नुकतच लोकार्पण करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या वारे, सुगवे, आरडे, माले आणि गौरकामत येथील प्राथमिक शाळांना ग्रामीण रोटरी क्लब तर्फे संगणक संच भेट देण्यात आले.  तसेच 12 वर्षाखालील 100विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. देवनार रोटरीचे मार्गदर्शक आणि ग्रामीण रोटरीचे प्रमुख  कन्नन तसेच पद्मा कपूर, संजय मेहता, कर्जत तालुका समन्वयक अर्जुन तरे, नेरळ येथील विद्या विकास शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम, शिक्षिका म्हसे, हुमगावचे मारुती बागडे, संदीप तरे, प्रकाश सोनावले, सुदाम मसणे, दिनेश बदे, विठ्ठल बदे, सीताराम बदे, दशरथ मुने यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; ३ ठार तर ८ जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे कोंबडी वाहतूक करणारा …

Leave a Reply