Breaking News

रायगडकरांना 44 कोटींचा चुना, दीड वर्षात फसवणुकीचे 224 गुन्हे

खोपोली : प्रतिनिधी

पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा व्यवहारात उपयोग न केल्याने, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी  गेल्या दिड वर्षात दोनशे चोवीस फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात 44 कोटी रुपये गमावले आहेत. रायगड जिल्ह्यात सन 2021 पासून जून 2022 पर्यंत 224 फसवणूक, अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात नागरिकांची 44 कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे.  गुंतवणूक योजना, बँक व्यवहार, मालमत्ता खरेदी, गृहप्रकल्प, सावकारी व नोकरी लावण्याचे आमिष देवून फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. अशा प्रकारे होणार्‍या फसवणुकीला आळा बसावा यासाठी जनजागृती करण्याकरीता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॅन्डी, पोस्टर व लिपलेट्स असे तयार करण्यात आले आहेत. हे स्टॅन्डी जनजागृती कार्यक्रम स्थळी वापरच्या सूचना संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. तसेच पोस्टर व भिंतीपत्रकेही दूरक्षेत्र, पोलीस चौक्या, तहसीलदार, पंचायत समिती, दुय्यम निबंधक,  भू-रचना, सेतू, ग्रामपंचायत व तलाठी आदी कार्यालये, तसेच बँका, न्यायालये, बसस्थानके, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने, शाळा, महाविद्यालय इत्यादी महत्वाच्या ठिकाणी परवानगी घेवून चिकटविण्याबाबत सांगण्यात आले आहेत.

 

नागरिकांनी योग्य ती खबरदारी, काळजी घेवूनच आर्थिक व्यवहार करावेत. तसेच आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये.

-अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड 

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply