उरण ः वार्ताहर
रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कातकरी आदिवासींसाठी कातकरी उत्थान योजना राबवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंगळवारी (दि. 22) रानसई येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिवासींना कोविड प्रतिबंधक लसीकरणदेखील करण्यात आले.
या शिबिराला उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, मंडल अधिकारी सी. आर. पाटील, तलाठी भाऊ सिलकर आदी उपस्थित होते.
यामध्ये 51 लहान मुलांची आणि 102 प्रौढ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे एका व्यक्तीला पहिला डोस, तर 79 आदिवासींना दुसरा डोस देण्यात आला.