Breaking News

पुनीत बिश्तचा विक्रमी झंझावात; 51 चेंडूंत 146 धावा

इंदूर : वृत्तसंस्था

सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी (दि. 13) मेघालयाचा कर्णधार पुनीत बिश्त याने 51 चेंडूंत नाबाद 146 धावा ठोकल्या. मिझोरमविरुद्धच्या सामन्यात त्याने 17 षटकार आणि सहा चौकारांची आतषबाजी केली. टी-20 मध्ये चौथ्या स्थानावर येऊन सर्वाधिक धावा ठोकण्याच्या विश्वविक्रमाची बिश्त याच्या नावावर नोंद झाली आहे. त्याने श्रीलंकेचा दशुन चनाकाचा विक्रम मोडला. चनाकाने 2016मध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना नाबाद 131 धावा केल्या होत्या. बिश्तच्या झंझावाताच्या बळावर मेघालयाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात मिझोरम संघ नऊ गड्यांच्या मोबदल्यात 100पर्यंतच मजल गाठू शकला. बिश्तच्या रूपात यष्टिरक्षक-फलंदाजाची टी-20मध्ये ही मोठी खेळी आहे. त्याने लोकेश राहुलला मागे टाकले. राहुलने आयपीएलमध्ये किंग्स पंजाबकडून नाबाद 131 धावा केल्या होत्या. याशिवाय बिश्तने तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. टी-20मध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून तो गेलच्या पंक्तीत बसला. गेलने 2013मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध 17 षटकार ठोकले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply