कर्जत : प्रतिनिधी
जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात राज्यातील दहा गावांचा कायापालट करण्यात येईल, अशी ग्वाही जीवनविद्या मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी भिवपुरी (ता. कर्जत) येथे दिली. कर्जत तालुक्यातील वैजनाथ परिसरात असलेल्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या वतीने भिवपुरी गावामध्ये ग्रामसमृध्दी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गावातील श्री दत्त मंदिर सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन येथील करण्यात आले होते. त्यात आनंद राणे बोलत होते. या गावातील प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी. यासाठी आम्ही जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. जीवनविद्या मिशनचे विश्वस्त मधुकर सरोदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डोंबिवली शाखेच्या वृषाली दळवी यांनी प्रास्ताविक केले. सरपंच संगीता माळी यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे, विजय मांडे, सचिन मुने, प्रवीण वाडला यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश कचरे यांनी केले.भिवपुरीचे उपसरपंच हरिश्चंद्र मिसाळ, जीवनविद्या मिशनचे विश्वस्त मधुकर सरोदे, डोंबिवली शाखा सचिव सुमित शिगवण, प्रकाश कदम, प्रा. शिशुपाल बोधले, प्रशांत आचार्य, राजू शिगवण, लिलाधर किल्लेदार, प्रकाश सोळंकी, प्रल्हाद तुपे, दीपक सोळंकी, गुलाब भोसले, प्रमिला गायकवाड, सुश्मिता बार्शी, रेखा गोरे, मेघाली शिगवण, सुनिता किल्लेकर, शुंभांगी मंचेकर, अनिता मुंज, श्रुती पालव, नम्रता पालव, सुचिता शेडगे, विद्या बोडस, सुचिता पांढरपट्टे, किमया शिगवण आदींसह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.