पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशांतील युवांसाठी सैन्यदलांमध्ये भरतीसाठी अग्निपथ योजना अंमलात आली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
अग्निपथ योजनेसाठी पात्रता वय 17.5 ते 21 असून पहिल्या वर्षी 46 हजार जागा भरण्यात येणार आहेत. याचा सेवा कालावधी चार वर्षे (प्रशिक्षण काळासह) असून वेतन दरमहा 30 ते 40 हजार हजार रुपये (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) तसेच दरवर्षी वेतनवाढ मिळणार आहे. या योजनेच्या अनुषंगाने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सेवा निधी अंतर्गत करमुक्त 11 लाख 71 हजार रुपये, सेवा काळात विशिष्ट प्रतीकचिन्ह, उल्लेखनीय कामगिरी बजावणार्यास सैन्यदलांप्रमाणेच गौरव आणि पुरस्कार, 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण, सेवाकाळात मृत्यू झाल्यास कुटुंबाला अतिरिक्त 44 लाख रुपये, अपंगत्व आल्यास एकरकमी 15 ते 44 लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे.
या योजनेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 5 जुलै असून योजनेच्या माहितीसाठी रोहित जगताप (8691930709) या क्रमांकावर तसेच पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …