Breaking News

पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणीसाठा वाढला

खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर

मागील काही दिवसापासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.यामुळे पनवेलकरावरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे.शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.

सध्याच्या घडीला पाण्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 एमएलडी पाणी लागतो.देहरंग धरणातून पाणीसाठा संपुष्ठात आल्याने पालिकेला एमजेपी कडून जादाचे पाणी घ्यावे लागले होते, मात्र धरणातील पाणीसाठा वाढल्याने पनवेलचे संकट टळले आहे. पनवेल महापालिकेच्या 277 हेक्टर जमीनीपैकी 125 हेक्टर क्षेत्रावर हे धरण बांधण्यात आले आहे. पनवेल शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी देहरंग धरण महत्वपूर्ण आहे. या धरणातून पनवेल शहराला रोज 12 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. 3.57 दशलक्ष घनमीटर साठवण करण्याची क्षमता या धरणाची आहे.शहरातील पाणी टंचाईमुळे पालिकेला विकतचे पाणी घ्यावे लागत असून लाखो रुपये याकरिता खर्च करावे लागत आहेत.

पावसाळा सुरुवात झाल्याने शहरवासियांना सध्या तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसून मे महिन्यापर्यंत धरणातील पाणी पालिकेच्या वापरात येत असतो. यावर्षी पाऊस लांबल्याने शहरवासियांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply