Breaking News

कामोठे येथे डॉक्टर्स डे उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने कामोठे डॉक्टर्स असोशिऐशनच्या वतीने कराडी समाज हॉल कामोठे येथे कोविडमध्ये ज्यांनी समाजाची सेवा केलेल्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांना पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते मान्यवर डॉक्टर्सला सन्मानित करण्यात आले.

या वेळी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केले होते. यामध्ये बहुतेक डॉक्टरांनी रक्तदान केले. कामोठे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, उपाध्यक्ष डॉ. खडबडे, सेक्रेटरी डॉ. संतोष कन्गूले, खजिनदार डॉ. गणेश साळे तसेच कामोठे डेन्टिस्ट वेलफेयर असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. स्वाती गणेश वारे, सेक्रेटरी डॉ. अनिकेत आवरे व आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, कामोठे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, उपाध्यक्ष डॉ. खडबडे, सेक्रेटरी डॉ. संतोष कन्गूले, खजिनदार डॉ. गणेश साळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.कामोठे डेन्टिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. स्वाती गणेश वारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply