Breaking News

काँग्रेसचे नेते मारुती देवरेंचा भाजपत प्रवेश

नागोठणे : प्रतिनिधी

रोहे तालुका काँग्रेसचा राजीनामा दिलेले मारुती देवरे यांनी मंगळवारी (दि. 30) मुंबईत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रामचंद्र देवरे, परशुराम तेलंगे, सचिन मोदी यांच्यासह मारुती देवरे यांचे शेकडो समर्थक भाजपत दाखल झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा नेते वैकुंठ पाटील, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी या वेळी उपस्थित होते. माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या मारुती देवरे यांच्या भाजप प्रवेशाने पेण विधानसभा मतदारसंघातील नागोठणे तसेच पेण, सुधागड, रोहे तालुक्यात विकासाची गंगा वाहायला पुन्हा प्रारंभ होईल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply