भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी (दि. 12) साजरा झाला. ठाणा नाका येथील विक्रांत पाटील यांचा जनसंपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त रेझ्युलोशन हेल्थ केअरच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रिक्षाचालकांना सीएनजीचे कुपन आणि एक कुडूंब एक रोप या उपक्रमांतर्गत झाडे वाटप या उपक्रमाचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या वेळी माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, सुभाष कदम, समीर कदम, प्रशांत कदम, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, स्वरुप पुंडलीक, राज डेरे, सत्ता घाघाडे, रोहन वाजेकर, सचिन कुलकर्णी, निलेश वाडेकर, देविदास खेडकर, वसुदा सोलंखी, स्वाती पवार, हर्षा ठक्कर, मानसी सुर्वे, निता सहा, कृपा सहा, जागृती सहा, मनिषा सावंत आदी उपस्थित होते.