Breaking News

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी जिंकली पदके

पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर आणि मास्टर गटाची पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच हैदराबाद येथील कोटला विजय भास्कर स्टेडियम या ठिकाणी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून रायगडचे दोन पुरुष आणि एक महिला खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले.
रायगडातील सलोनी पद्माकर मोरे (महाड) हिने ज्युनिअर स्पर्धेत 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक, महेश कृष्णा पाटील (खालापूर, वावोशी) यांनी मास्टर स्पर्धेत 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक, तर विनायक पाटील (खोपोली) यांनी मास्टर स्पर्धेत 59 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले आहे.
पदक विजेत्या खेळाडूंचे रायगड जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव तसेच शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारप्राप्त मारुती आडकर (खोपोली), संदीप पाटकर यांनी अभिनंदन केले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू सतिश पाताडे (मुंबई) यांनीसुद्धा या खेळाडूंचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply