नवी मुंबई : दसरा दिवाळी काळात मोठ्या प्रमाणात घरे आरक्षण करणार्या ग्राहकांनी खाजगी विकसकांकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत सिडकोने जाहीर केलेल्या परवडणार्या घरांच्या या महागृहनिर्मितीली चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ दिवाळीच्या पाच दिवसांत 20 हजार अर्ज सिडकोकडे जमा झाले आहेत. सिडकोने यंदा गृहनिर्मितीचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षी 15 हजार घरांची यशस्वी विक्री केल्यानंतर सिडकोने थेट 95 हजार घरांचा विकास आराखडा तयार केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेली ही सर्व घरे परिवहन सेवा आधारीत संकल्पनेवर आहे. ग्राहकांना घराशेजारीच वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी सिडकोने रेल्वे स्थानके, बस आगार आणि ट्रक टर्मिनल्स यांच्या जवळ 95 हजार घरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यातील पहिल्या टप्यातील नऊ हजार 249 घरांच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. या घरांचे बांधकाम आणि विक्री एकाच वेळी करण्यात आल्याने ग्राहकांना त्याचा आर्थिक फायदा होणार आहे. चार वर्षांपूर्वी सिडकोने खारघर येथे बांधलेल्या तीन हजार स्वप्नपूर्ती संकुलातील काही घरे शिल्लक राहिली होती. सिडकोने या शिल्लक घरांचीही या महागृहनिर्मितीतील घरांच्या विक्रीबरोबर सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घरांसाठी 5 नोव्हेंबर ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. या सर्व घरांसाठी 26 नोव्हेंबर रोजी सोडत काढली जाणार आहे.
Check Also
पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित
पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …