पनवेल : वार्ताहर
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्यावतीने पनवेल पंचक्रोशीत विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या, रुग्णांसाठी देवदूताची भूमिका बजावणार्या, वैशिष्ट्यपूर्ण आशा काही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सत्कारमूर्ती डॉ. प्रमोद गांधी, डॉ. म्हात्रे, डॉ. धर्मेश मेहता, डॉ. मृणाल बुवा, डॉ. जयश्री पाटील, डॉ समिक्षा नवरीकर, मा.डॉ शोभना पालेकर, डॉ. वैभवी पालेकर, डॉ. भूपिंदर सिंग साहनी, डॉ. मंदार कुंटे, डॉ. मंजरी कुंटे, डॉ. निलेश बांठिया, डॉ. प्रदीप महेंद्रकर यांचा क्लबच्या अध्यक्षा हेतल जे बालड, सचिव गिरा चौहान, उपाध्यक्षा ध्वनी तन्ना, संपादक बिजल मिराणी, सहसचिव वैशाली ठक्कर, क्लबच्या पत्रव्यवहार ममता ठक्कर, पुर्वी मेहता, हॅपी मेहता, जयश्री मंगलानी शुभांगी दीक्षित, नेहल शहा, नैना बांठिया, विजेता कोठारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.