खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच महोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणजे 15 ऑगस्ट रोजीचे शानदार ध्वजारोहण. हा ध्वजारोहणाचा सोहळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची उपस्थिती होती, तसेच महाविद्यालयाचे विकास मंडळाचे सदस्य प्रभाकर जोशी व दीपक शिंदे हे उपस्थित होते. या वेळी इतर मान्यवर सचिन वासकर व जयदास तेलवणे यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड व विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. अंतर्गत गुणवत्ता कक्षचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, डीएलएलईचे समन्वयक प्रा. महेश धायगुडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. प्रथमेश ठाकूर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल कांबळे इतर सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर महाविद्यालयातील व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सफीना मुकादम यांनी केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे या सर्वांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.