Breaking News

‘पागोटे ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलणार’

उरण : प्रतिनिधी

उरणचे तसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 9) घेण्यात येणार्‍या जनमत चाचणीत भाजप व मित्र पक्ष आपले बहुमत सिद्ध करणार, तसेच पागोटे गावचे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांना घरचा रस्ता दाखवून ग्रामपंचायतीवर कमळ फुलविणार, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

उरण तालुक्यातील महत्त्वाची समजल्या जाणार्‍या पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांनी पागोटे गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतचे सदस्य व पागोटे गावची जनता यांना विश्वासात न घेता कारभार केला. त्यामुळे पागोटे गावचे सरपंच यांच्यावर 29 जानेवारी 2021 रोजी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावात आठ विरुद्ध दोन मतांनी ग्रामपंचायत सदस्यांनी जिंकून सरपंचांना एक प्रकारे हादरा दिला होता.

सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील हे जनतेतून निवडून आल्याने मंगळवारी (दि. 9) तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. या जनमत चाचणीत पागोटे गावातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष हे आपले बहुमत सिद्ध करून पागोटे गावचे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांना घरचा रस्ता दाखवणार व ग्रामपंचायतीवर कमळ फुलणार, असा विश्वास भाजपचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply