पेण : प्रतिनिधी : सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास साधणार असल्याची ग्वाही पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी काळेश्री येथे दिली. पेण तालुक्यातील काळेश्री ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, वढाव नवनिर्वाचित सरपंच पूजा अशोक पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, सदस्या ज्योती म्हात्रे, नीलिमा म्हात्रे, सविता म्हात्रे, तरणखोप सरपंच अभिजीत पाटील, काळेश्री उपसरपंच शेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुमित पाटील, रंजना म्हात्रे, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, स्कूल कमिटी अध्यक्ष रमेश पाटील, सदस्य जगदिश पाटील, जलतरणपटू मधुरा पाटील, पेण नगर परिषदेेच्या माजी सभापती ज्योती म्हात्रे, लीलाधर वर्तक, अशोक पाटील, श्याम म्हात्रे, प्रकाश ठाकूर, देविदास वर्तक, रविकांत म्हात्रे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्षा प्रीतम पाटील सत्काराला उत्तर देत होत्या. पेण मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी या वेळी सांगितले. लोकप्रतिनिधींनी आपल्या गावाच्या जनतेशी एकरूप होऊन गावाचा सर्वांगीण विकास साधणे गरजेचे आहे. जनतेशी नाळ जोडली असल्यामुळे पूजा पाटील यांना जनतेने वढावच्या सरपंचपदी निवडून दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी अनेक शासकीय योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू, असे प्रीतम पाटील यांनी या वेळी सांगितले.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …