खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) अविष्कार अभिमुखता व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. हर्षा गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून भुमिका बजावली.
या व्याख्यानामधे वक्त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना संशोधनाचे प्रकार, महत्त्व, पद्धती याविषयी माहिती व मोलाचे मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचे आयोजन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नम्रता गजरा, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या केले.प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी या व्याख्यानासाठी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. महादेव चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय.टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिदेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.