मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सलून आणि ब्युटीपार्लस 28 जूनपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
ग्राहक व कारागिरांना मास्क अनिवार्य आहे. दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्वनियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागणार आहे. केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येईल. त्वचेशी संबंधित (उदा. दाढी) इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागणार आहे. याव्यतिरिक्त दुकानदारांना दुकानातील कर्मचार्यांनी ग्लोव्हज, प्रन आणि मास्कचा वापर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा अन्य वस्तूंचे सॅनिटायझेशन करणे बंधनकारक असणार आहे. दुकानातील वापरला जाणारा प्रत्येक भागही दर दोन तासांनी सॅनिटाईझ करावा लागणार आहे. याशिवाय फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा वापर बंधनकारक असणार आहे तसेच ज्या वस्तू लगेच नष्ट करणे शक्य नाही त्या वस्तू सेवा दिल्यानंतर सॅनिटाईझही कराव्या लागणार आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …