Breaking News

सीकेटी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गीतगायन स्पर्धा व बक्षिस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमा विविध उपक्रम राबवून साजरा केली जात आहे. त्याअंतर्गत पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त गीतगायन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ बुधवारी (दि. 20) झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वर म्हात्रे व गायक वृंदाने सादर केलेल्या गीताने झाली. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांचे व कला चिल्ड्रन अकादमीतर्फे शालांतार्गत चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेमधील विजेत्यांचा ही गुणगौरव करण्यात आले.

या वेळी इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या निलिमा शिंदे, शिक्षक पालक संघाचे सदस्य संकेश मोकल, स्मिता पाटील, नंदकुमार देशमुख, प्रियांका मयेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply