पनवेल : प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना आता सीआयडीच्या कोर्टवारीलाही सामोरे जावे लागत आहे. याबाबतची पुढील सुनावणी 28 जुलैला होणार आहे.
कर्नाळा बँकेतील सुमारे 550 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या खटल्यात घोटाळ्याचे सूत्रधार विवेक पाटील यांना सत्र न्यायालयात जामीन मिळू शकलेला नाही. आता राज्याच्या सीआयडीनेही पुन्हा विवेक पाटील यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी पनवेल कोर्टात सुरू झाली आहे.
सीआयडीने दाखल केलेल्या आरोपत्रावर बुधवारी (दि. 20) पनवेल कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती जे. डी. वडने यांच्या कोर्टात विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. सचिन म्हात्रे, तर सरकारतर्फे अॅड. प्रिती साळवी हजर होते, मात्र न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी विवेक पाटील यांना या वेळी कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. कोर्टाने पुढील सुनावणीसाठी 28 जुलै ही तारीख दिली आहे. ईडीबरोबरच सीआयडीचा ससेमिरा मागे लागल्याने विवेक पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …